काँग्रेसच्या आघाड्यांच्या मेळावा व सत्कार समारोहाचे शनिवारला आयोजन

0
21

गोंदिया,दि.०६ःः गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीअंर्तंगत येत असलेल्या ओबीसी विभाग,अनु.जमाती व जाती विभाग,जिल्हा काँग्रेस किसान विभाग व जिल्हा महिला काँग्रेसच्या कार्यकत्र्यांचा मेळावा व मध्यप्रदेश विधानसभेचे उपाध्यक्ष कु.हिना कावरे,मंत्री गुड्डा जायस्वाल आणि अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शनिवार ९ फेबुवारीला दुपारी २ वाजता करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे राहणार असून उदघाटन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे.अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष सीमा मडावी,माजी जि.प.अध्यक्ष एड.के.आर.शेंडे,प्रदेश काँगे्रस सचिव विनोद जैन,डॉ.योगेंद्र भगत,जि.प.सभापती रमेश अंबुले,लता दोनोडे,नामदेवराव किरसान,अमर वराडे,पृथ्वीपालसिह गुलाटी,प्रकाश रहमतकर,अशोक चौधरी,न.प.सभापती शकील मंसुरी उपस्थित राहणार आहेत.यासंदर्भात आज गोरेगाव तालुका काँग्रेस ओबीसी आघाडीची बैठक पार पडली.त्या बैठकीत कार्यक्रमासंदर्भात चर्चा करण्यात आली.या बैठकीला माजी आमदार व जिल्हा किसान काँग्रेस आघाडीचे अध्यक्ष रामरतनबापु राऊत,अमर वराडे, काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष जितेंद्र कटरे,अनु.जाती विभाग अध्यक्ष विशाल शेंडे,शिशुपाल पटले,सुनिल भालेराव,हितेंद्र जांभुळकर,सुनिल तिडके,भुवनसाव नरवरे,शामराव भगत,सुभाष देशमुख,अमर राहुल,अब्दुल साजिद,विनोद ठवकर,संदिप चौव्हाण,दिलीप बिरनवार,खेमराज साखरे आदी उपस्थित होते.