लाखनी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

0
31

लाखनी,दि.०६ःःदरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वप्नपूर्ती फाऊंडेशनच्या वतीने लाखनी येथे भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. आणि त्यानिमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, पोवाडे गायन स्पर्धा, व शिवसंस्कृती दर्शन नृत्य स्पर्धा अशा तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. वक्तृत्व स्पर्धा दिनांक १६ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता स्थानिक श्रीराम मंगल कार्यालय लाखनी येथे आयोजित केलेली असून या स्पर्धेसाठी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श माता राजमाता जिजाऊ, आजच्या युवकाला शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, कृषिप्रधान भारतातील बळीराजा हे विषय आहेत.
दिनांक १७ फेब्रुवारीला पोवाडे गायन स्पर्धा व शिवसंस्कृती दर्शन नृत्य स्पर्धा आयोजित केली असून ही स्पर्धा श्रीराम मंगल कार्यालय लाखनी येथे दुपारी २ वाजता आयोजित केली आहे. या दोन्ही स्पर्धांची थीम शिवशाही असली पाहिजे हा स्पर्धेचा नियम आहे. स्पर्धकांना पोवाडा सादर करण्यासाठी पाच ते सहा मिनिटांचा वेळ देण्यात येईल तर नृत्य सादर करण्यासाठी आठ ते दहा मिनिटांचा वेळ देण्यात येईल.
सर्व स्पर्धा ह्या खुल्या गटात असून सर्व स्पर्धांची पूर्वनोंदणी १३ फेब्रुवारी आधी करणे आवश्यक आहे. सदर स्पर्धेची पूर्वनोंदणी आकृती कम्प्युटर्स लाखनी, सुरभी स्टुडिओ लाखनी व निट्स कंप्यूटर मुरमाडी या ठिकाणी करता येईल. सर्व स्पर्धांसाठी २००१ रु. व स्मृतिचिन्ह, १५०१ रु. व स्मृतिचिन्ह, १००१ रु. व स्मृतिचिन्ह असे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक अनुक्रमे देण्यात येतील.
या सर्व स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी, युवकांनी, शाळांनी सहभागी व्हावे आणि अधिक माहीतीसाठी व नाव नोंदणीसाठी स्पर्धा संयोजक आशिष राऊत (मो. 9923484645), विशाल हटवार (मो. 7741862565) तसेच स्पर्धा सहसंयोजक लक्ष्‍मण बावनकुळे (मो. 7875578762), नितेश टिचकुले (मो. 9049894999) यांच्याशी संपर्क साधावा व या सर्व स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत वाघाये, सचिव सुधीर काळे, सहसचिव नीलेश राऊत, उपाध्यक्षा प्राची बेदरकर, महिला आघाडी प्रमुख अंजली भांडारकर यांनी केले आहे.