अमित शहा २८ ला सांगली दौऱ्यावर

0
18

सांगली,दि.22ः – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या २८ ला सांगली दौऱ्यावर येणार आहेत.  यानिमित्ताने श्री. शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली, कोल्हापूर, सातारा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या बूथप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत.सांगली, कोल्हापूर, सातारा व हातकणंगले  मतदारसंघातील भाजपच्या बूथ कमिटी, केंद्रप्रमुख तसेच आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यास मार्गदर्शन करतील. कर्नाळ रस्त्यावरील धनंजय गार्डन कार्यालय निश्‍चित करण्याच्या सूचना आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी चारही मतदारसंघांच्या बूथनिहाय सर्व प्रकारच्या तयारीचा आढावा होईल. यानिमित्ताने भाजपच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे.