अकोल्यात शिवसेनेच्या नगरसेवकांना नेले फरफटत

0
22

अकोला,दि.22- महापालिका सभागृहात भ्रष्टाचाराच्यासंदर्भात बोलू देत नाही, यावरून माइकसह इतर साहित्याचे नुकसान केल्याने भाजपचे महापौर विजय अग्रवाल यांनी शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा व गजानन चव्हाण या दोघांना शुक्रवारी (दि.22) सभेतच निलंबित केले.या कारवाईमुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर समोरच्या जागेत ठिय्या आंदोलन केले. परिणामी महापौरांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी बळाचा वापर करीत शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना सभागृहातून बाहेर फरपटत बाहेर काढत पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

अकोला शहरात योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे सुरु असून या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. या संदर्भात शिवसेनेकडून चर्चेची मागणी करण्यात आली.यावर महापौरांनी यासंदर्भात लेखी स्वरूपात माहिती देण्यात येईल असे सांगितले. मात्र महापौरांचे हे म्हणणे शिवसेनेच्या नगरसेवकांना मान्य नव्हते.त्यातच गोंधळाला सुरवात सभागृहात झाली अनं शिवसेनेच्या नगरसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.