उमेदवाराशिवाय भंडारा-गोंदियात सुरु झालाय प्रचार

0
22
खेमेंद्र कटरे
गोंदिया– महाराष्ट्रातील ११ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी मतदान होणार आहे.त्यासाठी १० मार्च रोजी केंद्रीय निवडणुकी आयोगाने आचारसंहिता सुध्दा लागू केली आहे.या मतदारसंघातील निवडणुकीसाठी २५ मार्च ही तारीख उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख.पण आजही मुख्य दोन्ही राजकीय पक्षांनी आपला उमेदवार कोण असेल हे अधिकृतपणे अद्यापही जाहीर केलेले नाही.तरीही सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या चिन्हावर प्रचाराला सुरवात केली आहे.
उमेदवारांच्या नावात काय आपल्याला तर पक्षाच्या चिन्हावरच मतदान करायचे ना मग कशाला वाट बघायची हे बिद्र घेऊन या मतदारसंघातील बलाढ्य दोन्ही राजकीय पक्षांनी उमेदवाराशिवाय प्रचाराला सुरवात केली आहे. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाईची आघाडी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राहिल हे स्पष्ट आहे.तसेच भारतीय जनता पक्षाकडे ही जागा असल्याने भाजपचाही उमेदवार रिंगणात राहणार हे स्पष्ट असल्यामुळे आपपल्या पक्षाच्या चिन्हाचा प्रचाराला गावपातळीपासून सुरवात झाली आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातच नव्हे तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या आमगाव विधानसभा मतदारसंघातही पक्ष कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल तळ ठोकून बसले आहेत.त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात पक्षपदाधिकारी व कार्यकत्र्यांच्या सभा व बैठका घेऊन उमेदवार कोन हा प्रश्न नाही तर पक्षाचा निवडणुक चिन्ह महत्वाचा सांगत प्रचाराला लागण्याच्या सुचना केल्या.त्यानुसार बुथनिहाय नव्हे तर जिल्हा परिषद गटानुसार बैठकांना सुरवात झाली आहे.त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्यावतीनेही आमदार परिणय फुके गेल्या चार-पाच दिवसापासून मतदारसंघात सातत्याने बैठका घेत आहेत.पक्षसंघटनेसह सामाजिक संघटना,जातीय समीकरण व नोकरदार वर्गातील संघटनाच्या प्रमुखांशी त्यांनी भेटीगाठीला सुरवात केली आहे.सोमवारला तर त्यांनी आपल्या नागपूर कार्यालयात निवडणुक नियोजनासंदर्भातील बैठकही पार पाडली आहे.
तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांनी तर जिल्हा परिषद गटनिहाय पक्षाच्या प्रचाराला सुरवात केली असून उमेदवार कोण हा महत्वाचा नाही तर आम्ही पक्षाच्या चिन्हाचा प्रचार करतोय अशी प्रतिक्रियाही दिली आहे.निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरवात झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसèया दिवशीपर्यंत  पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे भिमराव दुर्योधन बोरकर व सुहास अनिल फुंडे, अपक्ष यां उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.बहुजन वंचित आघाडीच्या,विदर्भ निर्माण मंचच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा जरी झाली असली तरी त्यांनीही अर्ज दाखल केलेले नाहीत.असे असतांना या मतदारसंघात नेहमीच विजयी उमेदवाराच्या विजयाचा फॅक्टर ठरणारा बसपा पक्ष अद्यापही शांत असून बसपवर पैसे देऊन उमेदवारी वाटपचा जो आरोप सातत्याने होत आला आहे,त्यामुळे यावेळी सुध्दा बसप काय करते याकडे मतदारसंघातील बसपच्या हक्काच्या मतदारांचे लक्ष लागले आहे.या निवडणुकीत अपक्ष रिंगणात उतरण्याची तयारी करणारे गोंदिया निवासी अड विरेंद्र जायस्वाल यांनी तर झंझावती दौरे सुरु केले आहेत.रेल्वे,भाजीबाजार,मंदीर,मश्जिद,पोलीस ठाण्यात जाऊन आपण काय करणार हे सांगायला सुरवात केली आहे.