अर्जुनी मोरगावात पोलिसांचे ध्वजसंचलन

0
10

अर्जुनी मोर,दि.21ःःयेत्या लोकसभा निवडणुका व विविध सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था  कायम राखण्यासाठी अर्जुनी मोर शहरात बुधवार २0 मार्च रोजी पोलिसांनी ध्वजसंचलन केले व शहरातील प्रमुख मार्गानी पथसंचलन केले.
सर्वप्रथम अर्जुनी मोर येथील महाराणा प्रताप चौक येथून ध्वजसंचलनाला तहसीलदार विनोद मेश्राम तथा देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे हस्ते झेंडी दाखवून सुरवात करण्यात आले.  बॅन्ड पथकात देशभक्ती गिताद्वारे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बॅन्ड पथक, ध्वजपथक, शस्त्र सज्ज सी-६0 जवानांचे दोन दल, मुनिर खान यांचे नेतृत्वात अल्पा १ बटालयीनचे जवान तथा नवेगावबांध, केशोरी व अर्जुनी मोर ठाण्यातील पोलीस बल, महिला पोलीस बल तथा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांसह संपूर्ण शहरात भव्य रॅली काढून ध्वजसंचलन करण्यात आले. लोकसभा निवडणुकी दरम्यान कुठलीही अप्रिय घटना होणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहील. यासाठी पोलिसांची कडक नजर राहील यासाठी ही रॅली काढण्यात आली.
संपूर्ण अर्जुनी मोर शहरात पथसंचलन करून ध्वजसंचलन रॅलीचे पोलीस स्टेशन अर्जुनी मोर येथे समारोप करण्यात आला. यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, अर्जुनी मोरचे ठाणेदार अनिल कुंभरे, नवेगावबांधचे ठाणेदार हनुमंत कवले, केशोरीचे ठाणेदार जाधव, नवेगावबांध नक्षल सेलचे बन्सु कोडापे प्रामुख्याने उपस्थित होते