महाआघाडी समर्थित नवनीत राणा यांची उमेदवारी दाखल

0
40

अमरावती,दि.२७: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी मंगळवारी येथील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांची यावेळी सोबत होती.महाआघाडीच्या मित्रपक्षांची सभा राजापेठ येथे सकाळी पार पडली. त्यानंतर नवनीत राणा यांनी विविध पक्षांच्या नेत्यांसह बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. महाआघाडीमधील पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धनंजय मुंडे यांची राजापेठ येथे पुलाखालच्या मोकळ्या जागेत जाहीर सभा झाली. व्यासपीठावर माजी मंत्री अनिल देशमुख, कमलताई गवई, आमदार रवि राणा, माजी मंत्री वसुधा देशमुख, रिपाइं (गवई गट) चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई, विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे, माजी आमदार रावसाहेब शेखावत, विश्वासराव देशमुख, माजी आमदार राजकुमार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, पुष्पा बोंडे, किशोर बोरकर, उषा उताणे, वसंतराव साऊरकर, प्रकाश साबळे, रामेश्वर अभ्यंकर यांच्यासह युवा स्वाभिमान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (गवई गट), पीरिप (कवाडे गट), खोरिप, बहुजन विकास आघाडी, शेकापसह महाआघाडीतील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अनिल देशमुख, रावसाहेब शेखावत, राजकुमार पटेल, डॉ. राजेंद्र गवई यांचीही भाषणे झाली.
आतापर्यंत ३६ उमेदवारांचे अर्ज
मंगळवारी अखेरच्या दिवशी नीलेश आनंदराव पाटील (आरिपा), नीलिमा नितीन भटकर (पीपीआय), सुनील डेव्हीड डोंगरदिवे (बहुजन मुक्ती पार्टी), पंचशीला विजय मोहोड (बहुजन मुक्ती मोर्चा), अपक्ष रीतेश गुलाबराव गवई, राजू नारायण कुºहेकर, राजू जामनेकर, सुमित्रा गायकवाड, प्रवीण महादेवराव सरोदे, आनंद श्रीराम धवणे, पंकज लीलाधर मेश्राम, लीलाधर तोताराम मेश्राम, लीलाधर शेषराव थोरात, अनिल नामदेवराव जामनेकर, रावसाहेब पुंडलिक गोंडाणे, राजू मानकर, दिनेश गुलाबराव गवई, प्रमोद लक्ष्मणराव मेश्राम, देविदास मनाजी तेलगोटे, किसनराव शेषराव शेंडे, गाझी सदोद्दीन जहीर अहमद आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले. याव्यतिरिक्त अरुण वानखडे (बसपा) व आनंदराव अडसूळ (शिवसेना) यांनीही पुन्हा मंगळवारी अर्ज दाखल केला. आतापर्यंत ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवारी अर्जांची छाननी जिल्हाधिकारी कार्यालयात २७ मार्चला सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. उमेदवार किंवा त्याचे अधिकृत सूचक वा निवडणूक प्रतिनिधी यांना २९ मार्चला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १८ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान मतदान होईल.