23 नंतर काँग्रेस तोडणार भाजपसोबतची युती;जिल्हाध्यक्षाचे प्रदेशाध्यक्षांना आश्वासन

0
14
गोंदिया(खेमेंद्र कटरे)दि.13-लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हास्तरावर काँग्रेसच्यावतीने आढावा बैठक घेऊन चिंतन केले जाईल अशी अपेक्षा होती मात्र तसे जिल्ह्यात झाले नाही.त्यातच प्रदेशपातळीवर मुंबई येथे प्रत्येक जिल्ह्याचा आढावा लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर घेण्यात आला.त्या आढावा बैठकीत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण व महाराष्ट्र प्रभारी मल्लिाकार्जुन खर्गे,माणिकराव ठाकरे,विजय वड्डेटीवार,सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत गोंदिया जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम(बाबा)कटरे यांनी आढावा सादर करतांना राष्ट्रवादीच्याच लोकांनी काम केले नसल्याचा ठपका ठेवताच वरिष्ठांनी चांगल्याच कानपिचक्या घेतल्या.त्यानंतर सावरत कटरे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या युतीमुळे काँग्रेस पक्षाला नुकसान झाल्याचे कबुल करीत आसोली जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणुक होताच येत्या 23 जूननंतर जिल्हा परिषदेतील भाजपसोबतची युती तोडण्याचे आश्वासन आढावा बैठकीत दिल्याने गोंदिया जिल्हा परिषदेतील भाजपसोबतची काँग्रेसची युती तोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वास्तविक म्हणजे 2018 मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत सर्वच मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर होता.याउलट काँग्रेसचे आमदार असलेले गोपालदास अग्रवाल यांच्याच गोंदिया मतदारसंघात आघाडीचा उमेदावर 3 हजार मतांनी मागे होता.त्यानंतर झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून भाजप उमेदवाराला 38 हजाराचे मताधिक्य मिळाल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्य्सांह मतदारांनाचा नेत्यावर विश्वास राहिला नसल्याचे बैठकिला उपस्थित नेत्यांनी सांगितले.2012 मध्ये गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे 58 सरपंच होते ते जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मात्र 2019 मध्ये 22 वर येऊन ठेपल्याचे सांगण्यात आले.जिल्हाध्यक्ष कटरे यांनी तर राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस नेत्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्यामुळेच आम्ही भाजपसोबत युती केल्याचे प्रदेशाध्यक्षासमोर सांगितले.त्यावर खर्गेंनी समविचारीपक्षाची विचारधारा महत्वाची नाही काय अशा प्रश्न करीत जिल्हाध्यक्षांना धारेवर धरल्यानंतर कटरे यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीमधील युती तोडण्याचे प्रदेशाध्याक्षासमोरील आढावा बैठकीत जाहिर केल्याची माहिती या बैठकीला उपस्थित नेत्यांनी दिली.जिल्हा काँग्रेसचे महासचिव अमर वराडे यांनीही भाजपसोबतच्या युतीमुळेच नगरपरिषद हातातून गेल्याचे सागंत येत्या विधानसभा निवडणुकीतही त्याचा परिणाम पडणार असल्याचे वरिष्ठांना या बैठकीत सांगतिले.