काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर सुशीलकुमार शिंदेंच्या नावावर गांधी कुटुंबियांचा शिक्कामोर्तब

0
16

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची जागा सुशील कुमार शिंदे घेणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही माध्यमांनी तर माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे पक्षांतर्गत बैठकांमध्ये सांगितले. सोबतच, पुढील अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील असावा त्यांचा आग्रह होता. यानंतर चर्चेत आलेल्या नावांपैकी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावावर एकमत झाल्याचे समोर आले आहे.