शेतकऱ्यांना अडवाल तर गाठ शिवसेनेशी पिक विमा कंपन्याना दम

0
12

गोंदिया,दि.05ः-पिकविमा कंपन्यांची मनमानी मुळे गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती असतानाही बहुतांश शेतकर्यांना पिक विम्याचा लाभ कंपन्यानी न दिल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात शेतकरी सापडल्याने यावर्षी शिवसेनेच्या पुढाकाराने शेतकर्यांकडून पिक विमाच्या व पिक विमा कर्जाची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यात मोहीम सुरु करण्यात आली असून विमा कंपन्यानी जिल्ह्यातील शेतकर्यांना जर न्याय दिला नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने या कंपन्याच्या मागे लागेल असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांनी दिली आहे.विमा कंपन्याच्या धोरणाबाबत व काही अटीशर्तीमुळे शेतकरी यांचे नुकसान होत असल्याची माहिती 27 जून रोजी मुंबईत यशवंत सभागृहात राज्याचे महसुल राज्यमंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन दिल्याचेही शिवहरे यांनी म्हटले आहे.सोबतच गोंदिया जिल्ह्यातील काही महसुल अधिकारी यांच्याबद्दल असलेल्या लेखी तक्रारीची प्रत देऊन कारवाईची मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.विमा कंपन्याच्यावतीने अचानक तांत्रिक अडचण पुढे केली जाऊन शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावून घेण्याचा प्रकार सुरु असल्याने  शेतकऱ्यांना अडवण्याचे आणि नागवण्याचे काम पिकविमा कंपन्या सर्रासपणे करत होत्या. विमा कंपन्याचा हा डाव ओळखून शिवसेनेने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विमा कंपन्यांना सज्जड दम दिला आहे.

शेतकऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक करणाऱ्या पिकविमा कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व मोठ्या जिल्हा परिषद गटात पिकविमा मदत केंद्र उभारण्याचे काम शिवसेनेने केले. या मदत केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम सुरू आहे. शिवसेनेच्या या सतर्कतेमुळे पिकविमा कंपन्याचे गौडबंगाल उघडकीस आले. शेतकऱ्यांना नागवण्याचे काम आतापर्यंत पिकविमा कंपनीने केले होते. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख शिवहरे यांनी कंपन्यांना सज्जड देत शेतकऱ्यांना अडवाल तर गाठ शिवसेनेशी आहे. या शब्दात कंपन्यांना बजावले होते.