केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे नवभारताची पायाभरणी- खा. सुनील मेंढे

0
11

भंडारा – केंद्रातील नवनियुक्त मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प हा नवीन भारताच्या निर्मितीची पायाभरणी करणारा आहे. कर संकलनात वाढ, घर घेणाऱ्यांना सवलत, छोट्या दुकानदारांना पेन्शन, रेल्वेच्या विकासासाठी खासगी उद्योगांचा सहभाग, नवीन शैक्षणिक धोरण तसेच वीज, पाणी गॅस साठी नॅशनल ग्रीड ची स्थापना, स्टार्ट अप साठी नवीन टीव्ही चॅनेल आदी विविध उपाययोजना यात समाविष्ट आहेत. २०२४ पर्यंत देशातील प्रत्येकाला पाणी देण्याचे उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे. एकूणच आगामी ५ वर्षात भारताला जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्था बनविण्यासाठीचा हा पथदर्शी अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी दिली आहे.