केंद्रीयमंत्री नितीन गडकरींविरोधात उच्चन्यायालयात याचिका दाखल

0
7

शपथपत्रांत चुकीची माहिती दिल्यावरून लोकसभेची निवड रद्द करण्याची मागणी

नागपुर ,दि.05:नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रित निवडणूकीमध्ये नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ना. गडकरी यांनी निवडणुक अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्राचे चुकीची माहिती दिल्याचा आरोप करीत त्यांची लोकसभेच्या सदस्यासाठी झालेली निवड रद्द करण्याची मागणी याचिकाकर्ते नाना पटोले यांनी केली आहे.
यावर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नागपूर मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर नागपूरचे नितीन गडकरी यांनी निवडणुक लढविली होती. त्यांचे विरुद्धा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नाना पटोले हे सुद्धा रिंगणार होते. या निवडणुकीत गडकरी यांनी पटोले यांचा पराभव केला होता. ना.गडकरी यांच्या सदस्यत्वाला आव्हान देणारी एक याचिक आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात आज दाखल करण्यात आली आहे. या संदर्भातील केसचा नं EP /13727 /2019 असा आहे. यामध्ये ना. गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात चुकीची माहिती दर्शविल्याचा आरोप याचिका कर्त्याने केला असून त्यांची लोकसभा सदस्य म्हणून झालेली निवड रद्द करण्याची मागणी श्री पटोले यांनी केली आहे.