25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home राजकीय भंडारा जिल्हा काँग्रेसच्या अनु.जातीविभागाने जाळला सुब्रमण्यम स्वामीचा पुतळा

भंडारा जिल्हा काँग्रेसच्या अनु.जातीविभागाने जाळला सुब्रमण्यम स्वामीचा पुतळा

0
21

तुमसर,दि.०८ः-भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द काढणारे भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामींचा पुतळा जाळत भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाने निषेध नोंदविला.स्वामी यांच्या कृत्याबद्दल प्रधानमंत्री यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली.यावेळी काँग्रेस सेवादलचे प्रदेश मार्गदर्शक अरविंद कारेमोरे, प्रदेश सचिव प्रमोद तीतीरमारे,प्रदेश महिला काँग्रेस महासचिव कुंदाताई वैद्य,भंडारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सीमाताई भुरे,शहर अध्यक्ष अमर रगडे, काँग्रेस, सुरेश मेश्राम अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग,एकता रोडगे अध्यक्ष भंडारा जिल्हा महिला काँग्रेस अनुसूचित जाती, शुभम गभने प्रदेश सचिव, स्नेहल रोडगे उपाध्यक्ष भंडारा जिल्हा अनुसूचित जाती,कान्हा बावनकार ओबीसी सेल शहर अध्यक्ष, महेंद्र मेश्राम महासचिव जिल्हा अनुसूचित जाती,संजय मेश्राम तुमसर तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती,शिव बोरकर अनुसूचित जाती तुमसर अध्यक्ष शहर,दिलीप मेश्राम महासचिव जिल्हा अनुसूचित जाती,सुरेख शहारे उपाध्यक्ष भंडारा जिल्हा महिला काँग्रेस अनुसूचित जाती,मनीषा चौरे अध्यक्ष तुमसर तालुका महिला काँग्रेस अनुसूचित जाती,माणिकचंद भुतंगे सचिव जिल्हा अनुसूचित जाती,पीयूष गजभिये,गणेश डोंगरे,अर्जुन रामटेके,विश्वनाथ बोरकर,किशोर डोंगरे आदी उपस्थित होते.