दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री डॉ.फुके

0
20

दहावी व बारावीमध्ये प्राविण्य प्राप्त दिव्यांग विद्याथ्र्यांचा गौरव
गोंदिया,दि.०८ : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. विविध क्षेत्रात दिव्यांग बांधवांनी आपली गुणवत्ता दाखवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. दिव्यांगांना कुठलाही निधी लागला तर त्यांच्या विकासासाठी निधी देण्यात येईल. दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.
७ जुलै रोजी गोंदिया येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये प्राविण्यप्राप्त जिल्ह्यातील दिव्यांग विद्याथ्र्यांच्या सत्कार समारंभाचे उद्घाटक म्हणून श्री.फुके बोलत होते. आमदार विजय रहांगडाले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, माजी जि.प.सदस्य राजेश चतुर, माजी न.प.सदस्य घनश्याम पानतावणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री डॉ.फुके पुढे म्हणाले, दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडून त्यांनाही आत्मसन्मानाने जगता यावे व एक समाजाचा घटक म्हणून दिव्यांगांना योग्य स्थान मिळावे यासाठी आपण प्रयत्नरत आहोत. दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जि.प.समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांना तीनचाकी सायकली वाटप करण्यात येतात. हा एक स्तुत्य उपक्रम असून यामुळे दिव्यांग बांधवांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण होणार असे सांगून ते पुढे म्हणाले, कोणताही दिव्यांग व्यक्ती त्यांना शासनाकडून मिळणाèया सोयी-सुविधांपासून वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांग मुलांनी मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्राविण्यप्राप्त मिळविलेल्या ईशा बिसेन (दहावी), प्राची बन्सोड (बारावी), आरती मटले (बारावी), विनोद बरडे (दहावी), स्नेहा वाघमारे (दहावी), अमीत बघेले (बारावी), जुनेद तुरक (दहावी), अक्षय भगत (बारावी), रामेश्वर राऊत (दहावी), रिना शहारे (बारावी), पुनीत पटले (बारावी), रोहन रंगारी (दहावी), लक्ष्मी जुगनाहके (बारावी), दर्शना थेर (बारावी), प्रशांत उपराडे (बारावी), निलेश्वर रकशे (दहावी), निलम मेश्राम (दहावी), आदित्य वलथरे (दहावी), एस.जितेंद्र दोडानी (बारावी) आदी विद्याथ्र्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात गौरव करण्यात आला. एकूण २३१ विद्याथ्र्यांपैकी १७७ दिव्यांग विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
यावेळी जि.प.समग्र शिक्षा जिल्हा समन्वयक कुलदिपीका बोरकर यांनी दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी राबविण्यात येणाèया विविध योजनांचा सादरीकरणाद्वारे उपस्थितांना माहिती दिली. प्रास्ताविक जि.प.समग्र शिक्षा दिव्यांग विभागाचे जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी केले. संचालन जि.प.सहायक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले यांनी केले. उपस्थितांचे आभार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.आर.हिवारे यांनी मानले. कार्यक्रमास दिव्यांग बांधव व त्यांचे पालक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.