भंडारा-गोंदिया जिल्ह्यातली युवासेना युवतींच्या पदांकरिता मुलाखती

0
14

मुंबई-  भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील युवासेना युवतींच्या पदाकरीता नेमणुका करण्यात येणार असून त्यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. युवासेनेचे पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचे सक्रीय सदस्य असणे आवश्यक आहे. गोंदिया जिल्ह्यातील पदांसाठी रविवारी, 21 जुलै रोजी 12 बाजता अग्रसेन हॉल, गोंदिया पोलिस ठाणेजवळ गोंदिया शहर येथे मुलाखती होणार आहेत. तर भंडारा जिल्ह्यातील पदांसाठी सोमवारी 12 जुलै रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, भंडारा शहर येथे मुलाखती होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी 1 तासाआधी  उपस्थित राहावे. तसेच मुलाखतीला येताना आपले छायाचित्र आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखतीच्या ठिकाणी ठेवण्यात येतील. असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.