तालुकास्तरीय विज्ञान मेळावा पासुन मूकणार देवरी तालुक्यातील विद्यार्थी

0
10

*शिक्षणविभागाची उदासीनता*

देवरी:21
राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर नागपूर यांच्या पत्रक्र विविमे/489/2019 दिनांक 9/7/2019 नुसार अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2019 या कार्यक्रमासाठी प्रत्येक शासनमान्य शाळेतील 8 वी ते 10 वी पर्यंतच्या विध्यार्थीना विज्ञान विषयक उपक्रमात सहभागी करण्यासाठी दि 10जुलै ते 23 जुलै 2019 कालावधीत तालुका स्तरावर प्रदर्शनी घेण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु सदर माहिती देवरी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना दि 20 जुलैला शनिवारी दुपारी 12:35 मिनिटांनी सोसिएल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती त्या वेळी 26 जुलैला प्रदर्शिनी आयोजित होणार असे नमूद केलेले होते परंतु आज (22) रविवारी सदर विज्ञान मेळावा तारखेत बदल करण्यात आलेला असून येत्या 23 जुलै  विद्यार्थ्यांना उपस्थित करण्याचे आदेश देण्यात आल्यामूळे एका दिवसात तयारी कसी करायची?
विद्यार्थ्यांना मेळाव्यात कस सहभागी करायचा ?
असे प्रश्न तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक आणि विज्ञान शिक्षकांना पडले आहे.
सदर प्रकरणामुळे शिक्षण विभागाची उदासीनता पुन्हा समोर आल्याचे दिसून येते.

सदर मेळाव्या बाबत काही मुख्याध्यापकांना माहिती विचारली असता स्थळ आणि दिनांक शिक्षण विभागाने ठरविलेला आहे त्यामध्ये बदल करता येणार नाही असे उत्तरे मिळाल्याचे सांगण्यात आले.

सदर प्रकरणामुळे ग्रामीण भागातील विध्यार्थी स्पर्धेच्या युगातून डावलला जात आहे हे खरे!