परिस्थितीशी लढण्यासाठी युवतींनी सज्ज व्हावे : मुकेश शिवहरे

0
22

गोंदिया,दि.26 : पुरुष प्रधान संस्कृतित आजही महिलांना दुय्यम दर्जा आहे. तेव्हा परिस्थितीशी लढण्यासाठी विशेष करून युवतींनी सज्ज व्हावे, असे आवाहन जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे यांनी केले. ते स्थानीक अग्रसेन भवन येथे आयोजित युवती मेळाव्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार संपूर्ण राज्यात युवती मेळावे घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने गोंदिया येथील अग्रसेन भवनात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय कार्यकारीनी सद्श्य तथा युवासेना सचिव दुर्गाताई शिंदे,सिनेट मेम्बर तथा युवासेना सदस्य शितल सेठ, नगरसेविका सुप्रता काटोपकर, युवासेना सद्श्य राहुल सावंत उपस्थित होते.
पुढे बोलतांना शिवहरे यांनी शिवसेनाच्या माध्यमातून अनेक समस्यांना वाचा फोटण्यात येते. त्याच अनुषंगाने समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या निर्देशावर चालून त्याचे अनुकरण करीत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्राच्या सक्षमीकरणाकरिता महिलांचा सक्षमीकरण होणे आवश्यक आहे, त्यासाठी युवतींनी परिस्थितीशी लढण्यास सज्ज व्हावे, असे मत व्यक्त केले. या मेळाव्याला भंडारा गोंदिया शिवसेना संपर्क प्रमुख निलेश धुमाळ ,विधानसभा प्रमुख बाळा परब,पुजा तिवारी यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष शैलेज जायस्वाल, सहसचिव निलेश पाटील, विक्रम राठोड, कंगेश राव, अश्विन गौतम उपस्थित होते. यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील युवतींनी सहभाग नोंदविला होता.