पुरपरिस्थिती बघता विधानसभा निवडणूका पुढे ढकला– मनसे

0
21

वर्धा,दि.22ः राज्यातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तसेच इतर काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे.यात अनेकांचे घरे, परिवार उव्दस्त झाले असून अन्न,वस्त्र ,निवारासाठी संघर्ष करावा लागत आहे.शेती पाण्याखाली वाहून गेली तर बरेच लोक या पुरात वाहून गेल्याने ते मृत्यूमुखी पडले आहेत.या सर्व परिस्थितीकडे बघून राज्य निवडणुक आयोगाने काहीकाळाकरीता विधानसभेच्या निवडणुका पुढे कराव्यात अशी मागणी वर्धा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देण्यात आले आहे.

विधानसभेच्या निवडणूका महाराष्ट्र राज्यात ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये घेत असेल तर योग्य नाही,सरकार पाहिजे तेवढी मदत आपादगस्तांपर्यत पोहचवत नसल्याने अद्यापही तेथील जनजीवन विस्कळीतच आहे.ते  व्यवस्थित होण्याकरिता अजून सहा महिने लागू शकते,या सर्व गोष्टीचा विचार करण्यात यावे असे मनसेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष अतुल वांदिले यांनी तहसिलदारांमार्फेत राज्य निवडणुक आयोगाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देते वेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष अतुल वांदिले,जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष रमेश घंगारे ,जिल्हा सचिव सुनील भुते,तालुकाध्यक्ष प्रवीण श्रीवास्तव शहराध्यक्ष राजू सिन्हा,शेतकरी सेना ता.ध्यक्ष गोमाजी मोरे, प्रल्हादजी तुराळे,शहर संघटक अजय पर्बत,सय्यद मुसताक़ मामू,अरमान मुसानी,फारुख शेख, उमाकांत उघडे,जितू रघाटाटे,बाळू घोटेकर,मधुकर गेडाम,धनंजय भोम्भे,जगदीश वांदिले,सुनील डांगरे,गजुभाऊ चीडे,नितीन भुते,संजय गाभूले,अनुप डहाके, प्रवीण भुते,नरेश चिरकुटे,अमोल मुडे, निखिल ठाकरे,राजू मुडे,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.