सौंदडच्या मामा तलाव रपट्याची पाळ फोडली

0
27

सडक अर्जुनी,दि.22ः- सौंदड येथील पूर्वजांच्या अथांग प्रयत्नाने निर्माण करण्यात आलेला सागर सारखा दिसणारा भव्य दिव्य असा मामा मालगुजारी तलाव आहे. काही वर्षांपूर्वी नियमानुसार पाणी वाटप कमेटी व पाटबंधारे विभाग सौंदड यांच्या संयुक्त प्रयत्नाने 6 इंच पाळ रपट्यावर बांधून तलावातील पाण्याची पातळी वाढवली होती जी गावाला व शेतकरी वर्गाला उपयोगाची होती. परंतु 14 ऑगस्टच्या रात्री काही समाज कंटकांनी सदर रपट्यावर बांधलेली 6 इंचेची मजबूत पाळ जवळपास 70 ते 80 फूट लांब पर्यंत अशी फोडली की जणूकाही या अगोदर रपट्यावर पाळच नव्हती की काय? गावक-यांनी सदर घटना गंभीरतेने घेत संबंधित विभाग व पाणी वाटप कमेटीकडे धाव घेतली परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदर प्रकरणाकडे गावकरी शंकास्पद नजरेने बघत आहेत.
पाळ फोडल्यामुळे मागील आठवड्यापासून हजारो गॅलन पाणी निघून गेले जे कोणाच्याही उपयोगाचे नव्हते. तरी संबंधित विभाग व पाणी वाटप कमेटीने सदर घटनेची गंभीर दखल घेवून ज्यांनी हा प्रकार घडवून आणला असेल अशा व्यक्तीवर कार्यवाही करावी अशी ग्रामस्थांनी केली मागणी आहे.