गोंदिया,दि.09ः-गेल्या अनेक वर्षापासून राम मंदिर आणि बाबरी मशीद हा विषय रेंगळून होता. या खटल्यातील दोन्ही पक्षांची बाजू आणि साक्षी-पुरावे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी तपासून आज निर्णय दिला. अत्यंत योग्य आणि हिन्दू किंवा मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या जाणार नाही, असा हा निर्णय असल्याचे भंडारा-गोंदियाचे खासदार सुनिल मेंढे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.सोबतच मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असून केंद्राच्या योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत खा.मेंढे बोलत होते.त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,शहर भाजप अध्यक्ष सुनिल केलनका,अशोक चौधरी,नगरसेवक दिनेश दादरीवाल,दिपक कदम,संजिव कुलकर्णी,पंकज रहागंडाले,शंभुशरणसिंह ठाकूर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले ायंनी राममंदीराचा विषय अनेक वर्षापासून चालत होता आज जो निर्णय लागला तो योग्य व भावनांचा आदर करणारा ठरला आहे या काळात शांतता टिकून रहावी ही आमची भुमिका व पक्षाची भूमिका राहिल्याचे सांगितले. तर खा.मेंढे म्हणाले की आज लागलेला निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे.कोण जिंकला हरला हे महत्वाचे नाही सर्व भारतीय आहेत.मला कारसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती असा उल्लेख करीत मुस्लीम समाजालााही न्यायालयाने वेगळी जागा उपलब्ध करुन दिल्याचा उल्लेख केला.तसेच देशात या निर्णयानंतरची शांतता जनतेने ठेवून बंधुत्वाची शिकवण भारतात असल्याचे दाखविल्याचे म्हणाले.





