राष्ट्रवादीने घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती

0
6

भंडारा ,दि.११:-: जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या.जिल्हा परिषदेसाठी ३९८ व पंचायत समितीसाठी १000 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मुलाखतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांनी आपल्या सर्मथकासोबत गर्दी केली होती. मुलाखती करीता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्कलसाठी उमेदवारांनी मुलाखती देताना प्रत्येक बुथप्रमाणे कार्यकर्ते मुलाखती दरम्यान आणले होते. प्रत्येक उमेदवारांने सर्मथकासोबत व केलेला आपल्या कार्याचा अहवाल सोबत देवून मुलाखती दिल्या. पक्षाने मुलाखती दरम्यान निवडूण येण्याची क्षमता व निकषावर भर दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांच्या मुलाखतीसाठी पार्लमेंट्ररी बोर्ड गठित केले असून भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक म्हणून माजी मंत्री रमेश बंग यांची नियुक्ती केली आहे. मुलाखती दरम्यान निरीक्षक उपस्थित होते. पार्लमेट्ररी बोर्डातील आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, धनंजय दलाल, सुनिल फुंडे, विलास काटेखाये, अभिषेक कारेमोरे, अविनाश ब्राम्हणकर, नलिनी कोरडे, कल्याणी भुरे, स्वप्नील नशिने, अनिल जैन, विठ्ठलराव कहालकर, शैलेश मयुर, योगेश हेडाऊ यांनी भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्राप्रमाणे मुलाखती घेतल्या.
मुलाखती दरम्यान तालुक्याचे अध्यक्ष देवचंद ठाकरे, नरेंद्र झंझाड, वासुदेव बान्ते, लोमेश वैद्य, डॉ. विकास गभणे, अंगराज समरीत, नरेश चुóो, ज्योती टेंभुर्णे, मनिषा नागलवाडे, प्रमिला साकुरे, माया अंबुले, सुनंदा मुंडले, विजय खेडीकरण, विजय पारधी, गुणवंतराव काळबांधे, सतीश डोनेकर, सुरेश बघेल, मुन्ना ठाकूर, आनंद बोदेले, पंकज ठवकर, अक्षय पवार उपस्थित होते. मुलाखतीदरम्यान इच्छुक उमेदवारांच्या चेहर्‍यावर उमेदवारी मिळण्याचे संकेत दिसत होते.