वाशिम, दि. २७ (जिमाका) : राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई २८ व २९ जून २०२० रोजी वाशिम दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
पालकमंत्री श्री. देसाई यांचे रविवार, २८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता वाशिम येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. सोमवार, २९ जून रोजी सकाळी ९.३० वा. पालकमंत्री श्री. देसाई यांच्या उपस्थितीत राज्य उत्पादन शुल्क कार्यालय परिसरात वृक्षारोपण. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी १० वा. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू संसर्ग व त्यावरील उपाययोजनांचा आढावा सभा होईल. सकाळी ११ वा. पोहरादेवी विकास आराखडा, पीक कर्ज वाटप, खरीप पेरणी, कायदा व सुव्यवस्था यासह इतर अनुषंगिक बाबींचा पालकमंत्री श्री. देसाई आढावा घेतील.
पालकमंत्री श्री. देसाई यांची दुपारी १.३० वा. वाशिम शासकीय विश्रामगृह येथे महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. दुपारी २ ते २.३० वा. पर्यंत राखीव. दुपारी २.३० वा. ते मंगरूळपीरकडे प्रयाण करतील. दुपारी ३ वा. पालकमंत्री श्री. देसाई मंगरूळपीर येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करतील. त्यानंतर ते कारंजाकडे प्रयाण करतील. दुपारी ३.४० वाजता कारंजा येथील प्रतिबंधित क्षेत्राची ते पाहणी करतील. त्यानंतर शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.





