गोंदिया दि.4: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्तवतीने आयोजित व बुधवारी पार पडलेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेत येथील प्रोग्रेसिव्ह शाळेचा संघ विजयी ठरला. विशेष म्हणजे या आधारे या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. १६ वर्षेवयोगटातील या संघात अमन बिरीया, गोपाल कटरे, मनोज गुप्ता, गौरव गुप्ता, आदिल शेख, अरूण जायस्वाल, संकेत दरवडे, विवेक पटले, विक्की राऊत, हिमांशु खोब्रागडे, शुभदिप पात्रा, अंकीत भगत, आदिल के. शेख, अनुज गुप्ता, अभिजीत रघुवंशी यांचा समावेश आहे. संघातील खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.