द.आफ्रिका दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर, अरविंद, गुरकिरतला संधी

0
10

बेंगळुरु, दि. २० – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे आणि टी – २० मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून कर्नाटकचा गोलंदाज एस. अरविंद (टी -२० मालिकेसाठी) आणि गुरकिरत मान (वन डे मालिकेसाठी) या नव्या चेह-यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

रविवारी बेंगळुरुत बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक पार पडली. सप्टेंबर अखेरीस दक्षिण आफ्रिका संघ भारत दौ-यावर येत असून यात टी – २०, एकदिवसीय व कसोटी मालिका परडणार आहे. टी -२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी बेंगळुरुतील बैठक संघाची निवड करण्यात आली. पुढील वर्षी टी -२० वर्ल्डकप होणार असल्याने टी – २० मालिकेतील संघाची निवड ही महत्त्वाची मानली जात आहे. कर्नाटकचा गोलंदाज एस. अरविंदला टी -२० मालिकेतील भारतीय संघात जागा मिळाली आहे. तर पंजाबचा फलंदाज गुरकिरत मानला एकदिवसीय मालिकेच्या भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. टी – २० मालिकेत हरभजन सिंग व अमित शर्मा या दोघा फिरकीपटूंचाही समावेश करण्यात आला आहे. पाच पैकी तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आज संघ निवडण्यात आल्याचे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. वन डे व टी -२० मालिकेत कर्णधारपदाची धूरा महेंद्रसिंग धोनीकडेच राहील असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ – महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाटी रायडू, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, अक्षर पटेल, गुरकिरत मान, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, उमेश यादव

टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ – शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, अंबाटी रायडू, महेंद्रसिंह धोनी, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, अक्षर पटेल, हरभजन सिंग, मोहित शर्मा, अमित मिश्रा, एस. अरविंद

भारत VS साउथ आफ्रिका शेड्यूल

टी 20 सीरीज
पहिला सामना : 2 ऑक्टोबर, धर्मशाला
दूसरा सामना : 5 ऑक्टोबर, कटक
तिसरा सामना : 8 ऑक्टोबर, कोलकाता
वनडे सीरीज
पहिला सामना : 11 ऑक्टोबर, कानपूर
दूसरा सामना : 14 ऑक्टोबर, इंदूर
तिसरा सामना : 18 ऑक्टोबर, राजकोट
चौथा सामना : 22 ऑक्टोबर, चेन्नई
पाचवा सामना : 25 ऑक्टोबर, मुंबई
टेस्ट सीरीज
पहिला सामना : 5-9 नोव्हेंबर, मोहाली
दूसरा सामना : 14-18 नोव्हेंबर, बेंगलुरु
तिसरा सामना : 25-29 नोव्हेंबर, नागपूर
चौथा सामना : 3-7 डिसेंबर, दिल्ली