विदर्भ-ओडिशा रणजी सामना आजपासून

0
11

नागपूर : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि रणजी करंडकात सर्वाधिक धावा नोंदविण्याचा मान मिळविणारा वसीम जाफर यांच्या उपस्थितीमुळे गुरुवार, एक ऑक्टोबरपासून जामठास्थित व्हीसीए स्टेडियम येथे ओडिशाविरुद्धचा मोसमातील रणजी करंडकाचा पहिला सामना रंगतदार होणार आहे.
गत मोसमात उपांत्यपूर्व सामन्यात तामिळनाडूकडून पराभूत झालेल्या विदर्भ संघाला २४ गुण मिळाले होते. गुजरातसोबत विदर्भ संयुक्तपणे तिसर्‍या स्थानावर होता. उत्कृष्ट धावसरासरीच्या आधारे विदर्भाने बाद फेरी गाठली होती.
यंदा विदर्भाचे पाच सामने नागपुरात खेळले जाणार असल्याने होमटर्फचा लाभ होणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
उभय संघ विदर्भ : एस. बद्रीनाथ (कर्णधार), गणेश सतीश, शलभ श्रीवास्तव, स्वप्नील बंडीवार, रवी ठाकूर, अमोल उबरहांडे, जितेश शर्मा, वसीम जाफर, रवी जांगीड, आदित्य सरवटे, आदित्य शनवारे, श्रीकांत वाघ, यादवेंद्र टेंभरे, अक्षय वखरे आणि उमेश यादव.
ओडिशा : बिप्लव सामंत रे (कर्णधार), गोविंद पोद्दार (उपकर्णधार), अभिलाष मलिक, अमित दास, गिरिजा राऊत, नटराज बेहरा, दीपक बेहरा, राजेश धुप्पर (यष्टिरक्षक) अनुराग सारंगी, आलोक चंद्र साहू, जयंत बेहरा, सूर्यकांत प्रधान, प्रतीक दास, बसंता मोहंती आणि रोशन कुमार राव.