महाराष्ट्र केसरी नागपुरात, 6 ते 10 जानेवारीदरम्यान

0
32

नागपूर  दि.१४-राज्यातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या यजमानपदाचा मान यंदा उपराजधानी नागपूरला मिळाला आहे. ही स्पर्धा चिटणीस पार्कवर ६ ते १० जानेवारी २०१६ दरम्यान रंगणार आहे. या कालावधीत राज्यातील दिग्गज मल्ल चांदीची गदा आणि रोख एक लाख रुपये जिंकण्यासाठी एकमेकांना आव्हान देतील.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे तसेच नागपूर जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्हे व महापालिका असे एकूण ४४ संघ स्पर्धेत सहभागी होतील. प्रत्येक संघात गादी आणि माती अशा दोन चमू असतात. कारण महाराष्ट्र केसरी स्पर्धा गादी व माती या दोन्ही गटात खेळली जाते. ६ जानेवारीला सर्व संघांचे नागपुरात आगमन होणार असून त्याच दिवशी मल्लांचे वजन आणि नाव नोंदणी केली जाणार आहे.