जपानला जोरदार भूकंपाचा धक्का

0
7
 वृत्तसंस्था
टोकियो दि.१४-– नैऋत्य जपानमधील युशू किनाऱ्याला आज (शनिवार) पहाटे जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यानंतर छोटी सुनामी निर्माण झाली होती. भूकंपामुळे कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
 
जपानच्या हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, युशू किनाऱ्याला आज पहाटे 5.51 मिनिटांनी बसलेल्या या भूकंपाची तीव्रता 7.0 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपामुळे दक्षिणेकडील कागोशिमा प्रांताला सुनामीचा फटका बसला. मात्र, सुनामीची तीव्रता भीषण नसल्याने मोठी हानी टळली. 
 
कागोशिमा येथील सेंदाई अणुउर्जा प्रकल्पाला सुनामीचा फटका बसला नसल्याचे वृत्त आहे. नाकोशिमा बेटांवर 30 सेंटीमीटरपर्यंत लाटा उसळल्या होत्या. गेल्या आठवड्यापासून तिसऱ्यांदा या भागाला भूकंपाचा धक्का बसला आहे.