विदर्भ स्तरीय कुंफू कराटे खुले चॅम्पियनशिप – २०२२ स्पर्धेमध्ये मार्शल आर्ट ॲड स्कूल गेम असोसिएशनच्या खेळाडूचे यश

0
13

चंद्रपुर: इन्स्पायर स्पोर्ट्स असोसिएशन, चंद्रपूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विदर्भ स्तरीय कुंफू कराटे खुले चॅम्पियनशिप-२०२२, जिल्हा परिषद शाळा, दुर्गापुर येथे आयोजित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातून खेळाडूंनी भाग घेतला होता.  जुबली हायस्कूल, चंद्रपूर येथील मार्शल आर्ट चे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी
या स्पर्धेमध्ये चांगले यश प्राप्त केले.
या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाचे मानकरी ठरलेले खेळाडू लक्की नंदाने,भानू नंदाने, स्वरूप मोहुरले त्याच प्रमाणे रोप्य पदकाचे मानकरी विराज पुणेकर, स्वरनिक पारूजी, रिदम कोटकर, शाश्वत वैरागडे, निधीश वानखेडे, दीप
मडावी, सौम्यता शृंगारपवार मानकरी ठरले. त्याचप्रमाणे कांस्य पदकाचे मानकरी मीत झोडे, सुमेध धावरे, क्रिश माहासाहेब, स्पृहा गंगावे, सिद्धांत रामटेके, हर्षल रामटेके, सौजन्या ईरबत्तनवार, तन्मय खोब्रागडे, तरुण
वडाले, प्रणाली निकोडे, साहिल हे ठरलेत तसेच “चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन” या मुलींच्या कॅटेगिरी मध्ये नारायणी
सोनटक्के हिने रोप्य पदक, ट्रॉफी व रोख बक्षीस जिंकले. तसेच ब्लॅक बेल्ट चॅम्पियनशिप मध्ये अमन आंबेकर व भारती संगेल यांनी सहभाग घेतला.सर्व खेळाडूने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक “विनोद पुणेकर” सर व आपल्या
आई-वडिलांना दिले.
या स्पर्धेमध्ये खेळाडूंन करिता मास्टर विनोद पुणेकर,आशिष रिंगणे,कैलाश बिडकर, अरविंद पडवेकर, सौ.रोशनी पुणेकर, नवनीत मुन, निर्धार आसुटकर, संतोष यनगंधलवार  आदी लोकांनी परिश्रम घेतले.