दबंग क्रिकेट क्लब ठरला आदर्श चषकाचा मानकरी

0
15

– अदासी/तांडा येथील क्रिकेट स्पर्धा
गोंदिया,दि १४  : आदर्श बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थेच्या वतीने आयोजित आदर्श टेनिस बॉल क्रीकेट स्पर्धा २०१६ चा अंतिम सामना आदर्श क्रिकेट क्लब अदासी व दबंग क्रिकेट क्लब आसोली या दोन्ही संघात होऊन अतितटीच्या झालेल्या सामन्यात दबंग क्रिकेट क्लबने विजय मिळविला.
अदासी/तांडा येथील पटांगणावर ७ ते ९ जानेवारी तीन दिवसीय क्रीकेट स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे शुभारंभ ७ जानेवारीला माजी जि.प.सदस्य जगदीश बहेकार, आशिष बारेवार,सभापती स्नेहा गौतम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. ९ जानेवारीला पुरस्कार वितरण  भाजप जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला, ना. बडोलेंचे स्वीय सहायक समीर बंसोडे, मुनेश रहांगडाले, सुधीर ब्राम्हणकर, सरपंच मोहन मेंढे, शेखर वाढवे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विजेत्या संघाला ११ हजार १११ रूपयाचा प्रथम पुरस्कार व आदर्श चषक तर उपविजेता ठरलेल्या आदर्श क्रिकेट क्लबला ६ हजार ६६६ रूपये व उपविजेते चषक प्रदान करण्यात आले. मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार शुभम परिहार यांना, मॅन ऑफ द मॅच अभिलाश व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बादल चव्हाण यांना गौरविण्यात आले. तसेच सर्व खेळाडूंना संस्थेतर्फे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता सोहन चव्हाण, पंकज कारंजेकर, रमा शेंडे, निशांत टेंभुर्णीकर, संदीप रहांगडाले, प्रशांत टेंभुर्णीकर, चेतqसह परिहार, अनिल ब्राम्हणकर, सुशिल बहेकार, भाविक बनकर, भालचंद्र पटले, राम शंकराचार्य, आहुल वरखडे, रवि पंधरे, राजा देशकर, प्रशांत लांजेवार, संजय पवार, श्यामचंद्र पटले, शुभम परिहार, अमन चंद्रिकापुरे, बादल चव्हाण, हितेश रहांगडाले, qपटू कारंजेकर, मनिष कोटांगले, जितू डोंगरे, गुड्डू परिहार यांनी सहकार्य केले.