तायक्वांडोपटू भाग्यश्रीचा सत्कार

0
9

देवरी ,दि.31: पंजाब येथील रुपनगर येथे पार पडलेल्या ६१ व्या राष्ट्रीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तायक्वांडो या खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या भाग्यश्री बावणे या विद्यार्थिनीचा बुधवारी आ.संजय पुराम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डवकी येथील सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असलेल्या भाग्यश्रीने आपल्या तालुक्याचेच नाही तर जिल्ह्याचे नाव उंचावले. मुली कोणत्याही क्षेत्रातमागे नाहीत. भाग्यश्री ही महाराष्ट्राची कोहीनूर आहे, अशा शब्दात आ.पुराम यांनी तिचा गौरव केला. डवकी येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवरी पंचायत समितीचे सदस्य तथा सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालायचे प्राचार्य महेंद्र मेश्राम, जि.प.च्या माजी सभापती सविता पुराम, देवरीचे खंडविकास अधिकारी एस.एम.मेश्राम, सहायक खंडविकास अधिकारी पांडे, डवकीच्या सरपंच सुषमा येल्ले, उपसरपंच उमराव बानवणकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विश्‍वनाथ परसगाये, पो.पा.अनिल वंजारी उपस्थित होते.