आशिया कप 2022:अजेय भारताचा पाकवर 5 गडी राखून विजय, हार्दिक ठरला मॅन ऑफ द मॅच

0
19

भारत-पाकिस्तानदरम्यानचा टी-20 सामना जणू एक सस्पेन्स अन् थ्रिलर होता. हार्दिक पंड्याने विजयी षटकार लगावत पाकला 5 विकेटसनी पराभूत केले. हार्दिकने 33 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम गोलंदाज करताना त्याने 3 महत्त्वाचे बळी टिपले. तोच मॅन ऑफ द मॅच ठरला. रविंद्र जडेजाने सर्वाधिक 35 धावा केल्या. पाकने प्रथम फलंदाजी करताना 147 धावा केल्या होत्या. भारताचा ओपनर राहुल शून्यावर बाद झाला. रोहित-कोहलीने धावांची पन्नाशी गाठून दिली. शेवटच्या 52 धावा हार्दिक-जडेजा यांनी जोडल्या.

-भुवी-पंड्याने घेतल्या 7 विकेट
भुवनेश्वरने 26 धावा देत 4 विकेट घेतल्या, पंडयाने 3 विकेट घेत 25 धावा दिल्या.
-शॉर्ट बॉलचा मोठा गेम
भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या 5 प्रमुख विकेट शॉर्ट बॉलवर घेतल्या. हा विक्रम.
-सर्व 10 विकेट पेसरचे
सर्व 10 विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. गेल्या सामन्यात (विंडीज) भारताने सर्व विकेट फिरकीवर घेतल्या होत्या. हाही विक्रम.
-…आणि विराट झाला कोहली
विराट तिन्ही फॉरमॅटमध्ये 100-100 सामने खेळणारा भारताचा पहिला, जगातील दुसरा खेळाडू. न्यूझीलंडचा रॉस टेलर पहिला.
-विक्रमी प्रेक्षकवर्ग
हॉटस्टारवर भारतात 1.3 कोटी तर पाकमध्ये एका अॅपवर १.३ कोटींनी सामना पाहिला.

हार्दिक प्लेयर ऑफ द मॅच – पंड्या 3 विकेट 33 धावा चौकार 4 षटकार 1

-पाकिस्तान : 147/10 -भारत : 148/5