राज्यस्तरीय अqजक्यपद तायक्वांदो स्पर्धा १९ फेब्रुवारीला

0
10

गोंदिया : दुसरी महाराष्ट्र राज्य खुली अqजक्यपद तायक्वांदो स्पर्धेचा शुुभारंभ १९ फेब्रुवारीला येथील पवार सांस्कृतिक भवनात होत आहे. या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व गोंदिया जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले हे तायक्वांदो असोशिएशन ऑफ महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश बारगजे यांच्या अध्यक्षतेखाली करतील. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, आमदार संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, पोलीस उपअधीक्षक सुरेश भवर, पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, शिक्षणाधिकारी अरूण फटे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेचे प्रविण बोरसे, तायक्वांदो असोसिएशनचे प्रदेश महासचिव मिqलद पगरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील शेकडो खेळाडू, पंच व प्रशिक्षक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील खेळाडूंना जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. ग्यानेंद्र येडे, महासचिव दुलीचंद मेश्राम यांनी केले आहे.