नियोजन विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धा 19 नोव्हेंबरला

0
17

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन,पाच जिल्ह्यांचा सहभाग

  गोंदिया दि. 18: अर्थ व सांख्यिकी संचालनालय व नियोजन विभागाच्या वतीने 19 नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल मरारटोली गोंदिया येथे विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी दुपारी  तीन वाजता  जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते होणार आहे.

          नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अर्थ व सांख्यिकी संचालनालय व नियोजन विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. नियोजन उपायुक्त नियोजन धनंजय सुटे, सहसंचालक कृष्णा फिरके व सहसंचालक सरिता मुऱ्हेकर नागपूर या हे स्पर्धेला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

          जिल्हा नियोजन अधिकारी नागपूर राजेश गायकवाड, उपसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय नागपूर मिलिंद नारिंगे, उपसंचालक नक्षल समन्वय समिती अनिल गोतमारे, उपसंचालक वस्त्रोद्योग आयुक्तालय निशा पाटील, उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय नागपूर, उपसंचालक सांख्यिकी कार्यालय नागपूर संजय पाठक, जिल्हा नियोजन अधिकारी  भंडारा शशिकांत बोरकर, जिल्हा नियोजन अधिकारी  वर्धा  राजीव कळमकर, जिल्हा नियोजन अधिकारी चंद्रपूर  गजानन वायाळ, जिल्हा नियोजन अधिकारी मानव विकास भंडारा मृणालिनी भूत, जिल्हा नियोजन अधिकारी गडचिरोली तेजबहादूर तिडके, सुनील धोंगडे, अरविंद टेंभुरणे व जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित  राहणार आहेत.

          या स्पर्धेत सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम 20 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी  चार वाजता होणार आहे. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील हे असणार आहेत. स्पर्धेचे आयोजक जिल्हा नियोजन अधिकारी  कावेरी  नाखले, उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय गोंदिया रुपेशकुमार राऊत व जिल्हा नियोजन अधिकारी मानव विकास श्रीराम पाचखेडे हे आहेत. या स्पर्धेत अर्थ व सांख्यिकी संचालनालय व नियोजन विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत.