सिरेगांवबांधच्या सरपंच पदी सागरताई चिमणकर, उपसरपंचपदी हेमकृष्ण संग्रामे पदारुढ

0
23

अर्जुनी मोर. :-तालुक्यातील सर्वाधिक सुंदर व विवीध उपक्रम राबवून संपुर्ण राज्यात नावलौकिक मिळविलेल्या स्मार्ट ग्राम सिरेगांवबांध च्या नुकत्याच झालेल्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत थेट जनतेमधुन निवडुण आलेल्या सागरताई चिमणकर ह्या 11 नोव्हेंबर रोजी सरपंच पदी आरुढ झाल्या. तर उपसरपंचपदी हेमकृष्ण संग्रामे हे बिनविरोध निवडून आले आहेत.
अर्जुनी मोर तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवुन संपुर्ण राज्यात नावलौकिक मिळविलेल्या व विविध पुरस्कार प्राप्त सिरेगांवबांध ग्रामपंचायतीची निवडणूक 16 ऑक्टोबर रोजी पार पडली. तत्पूर्वी नऊ ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडुन आले होते. हे येथे उल्लेखनीय, सरपंच पद अनुसूचित जाती स्री वर्गासाठी आरक्षित होते, .16 ऑक्टोबर रोजी  सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. सरपंच पदासाठी चार महिला रिंगणात होत्या.थेट जनतेमधुन झालेल्या या निवडणुकीत सागरताई चिमणकर ह्या सर्वाधिक 396 मते घेवुन सरपंचपदी निवडुन आल्या.त्यानंतर उपसरपंच पदासाठी 11 नोव्हेंबर ला निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायत भवनात झालेल्या या निवड कार्यक्रमात निवडणूक निर्णय अधिकारी ना.त.भुमेश्वर गेडाम यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित सरपंच सागरताई चिमणकर यांना सरपंच पदी पदारुढ केले.नंतर नवनिर्वाचित सरपंच चिमणकर ताई यांचे अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली.यामधे सर्वानुमते उपसरपंच पदी माजी सरपंच हेमकृष्ण संग्रामे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सिरेगांवबांध ग्रामपंचायत नवनिर्वाचित उपसरपंच हेमकृष्ण संग्रामे,सह यशवंत कुंभरे, गणेश मरसकोल्हे, चोपराम चाचेरे,तिलोत्तमाबाई कापगते, अमिता खोब्रागडे, लता सयाम, जोशना मरसकोल्हे, छाया गहाणे ह्या बिनविरोध ग्रा.पं.सदस्य म्हणुन निवडणूक आल्या.
उपसरपंच पदी विराजमान हेमकृष्ण संग्रामे हे यापूर्वी सिरेगांवबांध चे सरपंच होते. व अर्जुनी मोर. तालुका सरपंच व उपसरपंच संघटनेचे अध्यक्ष होते.त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात गावाचा चेहरा,मोहरा बदलविला, गावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवुन अनेक पुरस्कार मिळवून दिले,एवढेच नव्हे तर स्मार्ट गाव करुन संपुर्ण राज्यात सिरेगांवबांध चे नाव उज्वल केले, व ग्रामस्वच्छता अभियान राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सुध्दा गाव आणले,आठ नोव्हेंबर ला राज्यस्तरीय ग्रामस्वच्छता अभियान समिती तपासणी साठी गावात येवुन गेली आहे. यापुढे आपन तालुक्यातील गावासोबतच गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायती ना यशोशिखरावर नेण्यासाठी आपन मार्गदर्शन करणार असल्याचे हेमकृष्ण संग्रामे यांनी सांगितले.