जलतरणपटू मायकेल फेल्प्सची ‘गोल्डन’ कामगिरी

0
6

वृत्तसंस्था
रिओ दी जानेरो, दि. 10 – ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलिट अमेरिकेच्या मायकल फेल्प्सची यशस्वी घोडदौड सुरुच आहे. मायकल फेल्प्सने रिओतील जलतरण स्पर्धेत कारकिर्दीतील 21वं पदक सुवर्णपदक जिंकलं आहे. ४x२०० मी. फ्री-स्टाईल रिले प्रकारात मायकल फेल्प्सचा सहभाग असेल्लाय अमेरिकेला सांघिक सुवर्णपदक मिळाले आहे. एकाच दिवशी मायकल फेल्प्सने दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. याअगोदर झालेल्या २०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण पदक मिळवत अगोदरर त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला होता.

फेल्प्सचे ऑलिम्पिकमधील हे 21 वे सुवर्णपदक ठरले. त्याने खेळाच्या या महाकुंभात आतापर्यंत एकूण 25 पदके आपल्या नावे केली आहेत.