आता बोंबला ऽऽऽ… जिल्हा परिषदेच्या मानगुटीवर भूत?

0
10

सुशिक्षितांनी गाठली अंधश्रद्धेची परिसीमा

गोंदिया १०- शीर्षक वाचून कोणीही दचकू नका. शिक्षणाने मानवाच्या मेंदूतील अज्ञानरूपी अंधार दूर होऊन ज्ञानाच्या प्रकाशवाटा मोकळ्या होत असल्याचे सत्य मांडले जात असताना गोंदिया जिल्हा परिषदेच्या मानगुटीवर भूत बसल्याच्या अफवेने सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. उल्लेखनीय म्हणजे उच्च विद्याविभूषितांचा भरणा असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेत अशा रीतीने अंधश्रद्धा पसरविली जात असेल, तर अशिक्षितांना व ग्रामीण जनतेला नावे ठेवून काय उपयोग? असा सवाल जनतेला पडला आहे.
गोंदिया जिल्हा परिषद निर्माण होऊन सुमारे १८ वर्षांचा कालावधी लोटला. या संस्थेसाठी स्थानिक पतंगा मैदानात भव्य वास्तू उभारण्यात आली. पदाधिकारी व अधिकारी-कर्मचाèयांसाठी सुद्धा निवासस्थाने बांधण्यात आली. या वास्तूत प्रवेश करण्याकरिता एक मुख्य प्रवेशद्वार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेकडून अपंग व्यक्तीसाठी रॅम्पची सोय करण्यात आली आहे. त्याच्या मागच्या दिशेने सुद्धा एक पोर्च असून तेथूनसुद्धा कोणालाही मुख्य इमारतीत प्रवेश करता येतो. काही दिवसापूर्वी कोणीतरी जिल्हा परिषदेच्या सभागृहात भूत बघितल्याची अफवा परिसरात पसरविली. यामुळे या अफवेच्या चर्चेने चांगलाच रंग दाखविला. परिणामी, जिल्हा परिषदेतील शासन व प्रशासन कमालीचे दहशतीत असल्याची चांगलीच चर्चा आहे. या अफवेला घाबरून पदाधिकारी व अधिकारी यांनी मागील पोर्च व वित्त विभागाच्या दिशेने असलेली रॅम्प बंद केल्याने मुख्य इमारतीत प्रवेश करण्याकरिता आता एकच मुख्य प्रवेश द्वार शिल्लक आहे. याबाबत एका पक्षाच्या नेत्याने मुख्याधिकाèयांना विचारणा केली असता त्यांनी कर्मचाèयांच्या अवेळी कार्यालयातून पळून जाण्याचे कारण सांगून वेळ मारून नेली. याविषयी काही लोकांनी पदाधिकारी व अधिकारी यांचेशी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कोणीही बोलायला तयार नाहीत.