प्रोग्रेसिव्ह शाळेतील विद्यार्थ्यांना सेपक टकरामध्ये यश

0
14

गोंदिया,दि.14:- महाराष्टÑ राज्य क्रिडा विभागाव्दारा आयोजीत जिल्हा स्तरावर सेपक टकरा प्रतियोगीता आपल्या उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करून १४ वर्षिय वयोगट प्रतियोगीतेत विजय संपादन करून विभागीय स्तरावरील प्रतियोगीतेत स्थान प्राप्त केले १४ वर्षिय वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये मा. आशिष कापसे, मा. योगेश फुंडे, मा. आयुष शेंडे व मा. उत्कर्ष शेंडे ने प्राप्त केले. पुढील विभागिय प्रतियोगीता गोंदिया क्रिडा संकूल मध्ये खेळणार आहे. विजयी विद्यार्थ्यांने आपल्या यशाचे श्रेय आई-बाबांना त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थाध्यक्ष श्री. पंकज कटकवार, सचिव श्री. निरज कटकवार प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कमुदीनी तावाडे, श्रीमती वाय. आशा राव, अभय गुरव, श्रीमती विणा कावळे, कृष्णा चौहान, निधी व्यास, विलास नागदेवे, प्रमोद वाडी, मिनाक्षी महापात्रा, वर्षा सतदेवे, सुषमा वर्षिकर, कुलदिप भौतिक, तोमेश पारधी, सुरेखा बघेल, लिना ठाकरे, पॅट्रीसिया जॉर्डन क्रिडा अध्यापिका ज्योती पहिरे, विशाल कांबडी, खुशबु बांगडकर आदिंना दिला.सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने यशस्वी विद्यार्थीनीचे पुष्पगुच्छ देउन हार्दिक अभिनंद केले.