डिजीटल शाळेसाठी सरसावले माजी विद्यार्थी

0
13

माजी विद्याथ्र्यांचा शाळेच्या वतीने सत्कार
गोंदिया ,दि.14 : शाळा डिजीटल करायचे आहे. मात्र शाळानिधी, लोकवर्गणी करुनही निधीची कमतरता असल्याचे लक्षात आल्याने शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कार्यालय सटवाच्या पुढाकाराने गावच्या शाळेत शिवूâन चांगल्या पदावर काम करणारे माजी विद्याथ्र्यानी डिजीटल शाळेसाठी वर्गणी करुन शाळा डिजीटल करण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी शाळेच्या वतीने या सर्व माजी विद्याथ्र्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
सध्याचे युग विज्ञानाचे युग असल्याने विद्याथ्र्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत व्हावे व गावच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी स्पर्धेत टिवूâन रहावे यासाठी जिल्हयात शाळा डिजीटल करण्याचे काम शिक्षण विभागाच्या वतीने सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून सटवा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळा डिजीटल् करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. मात्र शाळानिधी, लोकवर्गणी करुनही निधीची कमतरता असल्याचे लक्षात आल्याने शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कार्यालय सटवाच्या पुढाकाराने गावच्या शाळेत शिवूâन चांगल्या पदावर काम करणारे माजी विद्याथ्र्यानी डिजीटल शाळेसाठी वर्गणी करुन शाळा डिजीटल करण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी शाळेच्या वतीने या सर्व माजी विद्याथ्र्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सटवाचे सरपंच रमेश ठावूâर, उद्घाटक म्हणून गोरेगावचे गटशिक्षणाधिकारी कावळे तर प्रमुख अतिथी म्हणून वेंâद्रप्रमुख निशा बोदेले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर भगत, पोलिस पाटील टिकाराम रहांगडाले, तंमुस अध्यक्ष हिवराज ठावूâर, सेवानिवृत्त शिक्षक भरतलाल ठावूâर, डॉ. के.टी.कटरे, इंद्रराज ठावूâर, कन्हैयालाल कोल्हे, केशोराव ठावूâर,धर्मराज ठावूâर, संजय कटरे आदी उपस्थित होते. यावेळी गावच्या शाळेत शिक्षण घेवून विविध ठिकाणी नोकरी करीत असलेले २५ जणांचा सत्कार करण्यात आला. यात गावात शिक्षण घेवून प्राध्यापक झालेले, बँक मॅनेजर, शिक्षक, जिल्हापरिषद विभाग, दूरसंचार विभाग यात नोकरीवर ओमेंद्र ठावूâर, देवकांत ठावूâर, धनेंद्र रहांगडाले, भागचंद्र रहांगडाले, महेंद्र ठावूâर, चंद्रशेखर कटरे, डिलेंद्र कटरे, रविशंकर कटरे, मुनेश्वर ठावूâर, होलराज कटरे, हितेंद्र कटरे, बाबूलाल कोल्हे, दयानंद कटरे यांचा समावेश होता. यावेळी माजी विदयाथ्र्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेप्रती आभार मानून असे कार्यक्रम होत रहावे व यापुढे शाळेला ज्या काही अडचणा असतील त्या सोडविण्यासाठी आपण तत्पर राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार एस.यू.वंजारी यांनी केले