ओबीसी मोर्च्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात यश-माजी खासदार डॉ. बोपचे

0
9

गोंदिया,दि.14:- मागील ६० वर्षाच्या इतिहासात प्रथमच ओबीसी समाजाने आपल्या संवैधानिक अधिकारासाठी काढलेल्या ८ डिसेंबरच्या मोर्च्याने शासनाचे लक्ष आकृष्ट केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नागपूरातील ओबीसी मोर्च्याच्या मागण्या मी वाचल्या असून त्या रास्त आहेत. व त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल अशी कबुली दिल्याने मोर्च्याचे उद्येश यशस्वी झाले असले तरी या संघर्षाचा हा अंतिम टप्पा नसून संघर्षाची सुरवात आहे. त्या दृष्टीने आगामी २०१७ मध्ये ७ आॅगस्टला दिल्लीत आयोजीत मोर्चा यशस्वी करण्यासाठी आतापासूनच संघर्षाची ज्योत कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राष्टÑीय ओबीसी मोर्च्याचे राजकिय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यांनी केले.
डॉ. बोपचे मयुर लॉनमध्ये आयोजीत गोंदिया जिल्हा संघर्ष समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. ८ डिसेंबरच्या मोर्च्यात आढावा घेण्यासाठी ही सभा आयोजीत करण्यात आली होती. सभेला राष्टÑीय ओबीसी युवा मोर्च्याचे अध्यक्ष चव्हाण, गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, कार्याध्यक्ष अमर व-हाडे, मनोज मेंढे,प्रा.एच.एच.पारधी,प्रा.बी.एम.करमकर,डाॅ.गुरुदास येडेवार, खेमेंद्र कटरे,विनायक येडेवार,सावन कटरे,विनोद चौधरी,डी.यु.रहागंडाले,कैलास भेलावे,रमेश ब्राम्हणकर, सावन डोये,मनोज डोये,दिनेश हुकरे,हरिष कोहळे,लिलेश्वर रहागंडाले, चंद्रकुमार बहेकार, रवि सपाटे,दिलीप चव्हाण,गुड्डू कटरे,ओम पटले,अशोक रिनायईत,प्रकाश पटले,गणेश बरडे,सुरेश भदाडे,भरत शरणागत व जिल्ह्यातील जिल्हा व तालूका कार्यकारीणीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. बोपचे पुढे म्हणाले की ८ डिसेंबरच्या मोर्च्याच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्याने आपली संटनात्मक पकड मजबुत केली असल्याचा प्रयत्न आणून दिला आहे. यासाठी सर्व पदाधिकारी अभिनंदनाचे पात्र आहेत. याप्रसंगी बोलतांना जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी राजकिय जोडे बाजूला ठेवून सर्व सामान्य पिडीत ओबीसी जनतेला भारतीय राज्य घटनेच्या कलम ३४० अन्वये मिळालेल्या अधिकाराचा लाभ मिळविण्यासाठी जी एकजुटता दाखविली त्या बाबद सर्वांचे आभार व अभिनंदन करून संघर्ष समितीच्या सर्व व्यवहार पारदर्शकरित्या जाहिर करण्यात येईल अशी माहिती दिली. चव्हाण यांनी आज ख-या अर्थाने ओबीसी लोक जातीपंथाची बंधने झुगारून आपल्या हक्कासाठी एकत्र आल्याचे सांगून नवाजलेल्या वृत्तपत्र व इलेक्ट्रानिक्स मिडीयाने ओबीसींच्या मोर्च्याला डावल्याचा आरोप केला व या आढावा बैठकीचे आयोजन करून गोंदिया गोंदिया जिल्ह्याने बाजी मारल्याचे सांगितले. तसेच नुकत्याच महाराष्टÑ लोकसेवा आयोगातर्फे पोलीस निरीक्षकांच्या जाहिरातीत ओबीसी प्रवर्गाच्या जागा न दाखविल्याबद्यल या जाहिरातीचे जाहिर करून निषेध नोंदवावा असे आवाहन केले. सभेचे संचालन खेमेंद्र कटरे यंनी तर आभार शिशिर कटरे यांनी मानले.