प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यीनीचा राज्यस्तरीय थाई बॉक्सींग स्पर्धेत विजय

0
12

गोंदिया,berartimes.com दि.01-महाराष्टÑ राज्य क्रिडा विभागाव्दारा आयोजीत विभागीय स्तरावर थाई बॉक्सींग स्पर्धेत १९ वर्षिय विद्यार्थ्यीनीच्या वयोगटातून श्रीमती उमाबाई बहुउद्येशिय शिक्षण संस्था व्दारा संचालीत प्राग्रेसिव्ह सायन्स ज्यु. कॉलेज गोंदिया ची विद्यार्थीनी कु. श्रृती ब्राम्हणकर चा राज्यस्तरावर थाई बाक्सींग स्पर्धेत निवड झाली. जिल्हा व विभागीय क्रिडा विभागाव्दारा कास्य पदक देउन विजयी विद्यार्थीनीचा गौरव करण्यात आले. १९ वर्ष प्रतियोगीतेत ५४ ते ५७ वजनगटात राज्य स्तरावर थाई बॉक्सींग मध्ये तृतीय स्थान प्राप्त करून ब्रान्स मॅडलची मानकरी ठरली. विजयी विद्यार्थ्यीनीने आपल्या यशाचे श्रेय आई-बाबाना त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थाध्यक्ष श्री. पंकज कटकवार, सचिव श्री निरज कटकवार, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कमुदीनी तावाडे, श्रीमती वाय. आशा राव, अभय गुरव, श्रीमती विणा कावळे, कृष्णा चौव्हाण, निधी व्यास, विलास नागदेवे, प्रमोद वाडी, मिनाक्षी महापात्रा, वर्षा सतदेवे, सुषमा वर्षिकर, तोमेश पारधी, सुरेखा बघेल, लिना ठाकरे, रिमा साहू, क्रिडा अध्यापिका ज्योती पहिरे, विशाल कांबडी, खुशबू बांगडकर, आदिंना दिला. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने यशस्वर विद्यार्थ्यीनीचे पुष्पगुच्छ देउन हार्दिक अभिनंदन केले.