ग्रा.प. जेठभावडा येथे विशेष ग्राम सभेचे आयोजन

0
14

देवरी,berartimes.com,दि.01:- गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त देवरी तालूक्यातील आय.एस.ओ. नामांकनाने सन्मानित ग्रामपंचायत जेठभावडा येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी जेठभावडाचे सरपंच डॉ. जे.टी. रहांगडाले हे होते. याप्रसंगी देवरीचे तहसीलदार संजय नागतिळक,पत्रकार नंदूप्रसाद शर्मा, उपसरपंच भोजराज गावळकर, सचिव एस.डब्ल्यू. बन्सोड, तलाठी राजूभाउ उपरीकर, सुरेंद्र उके, ग्रा.प. सदस्य शीलाबाई गावळकर, गितांजली शहारे, शुभद्राबाई किरसान, पोलीस पाटील राजेंद्र गावळकर, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक वाय.ए. राउत, एम.एम. सयाम, सहायक शिक्षक पी.एच. बागडे, रोजगार सेवक मंगेश डोंगरे, शिपाई सुरज मेश्राम, श्रीपद धानगून, कृषी सेवक ललीतताई धानगाये, वनपाल श्री शिवणकर, तंटामृक्त अध्यक्ष सुरज मेश्राम, राजकुमार मोटे यांच्यासह या ग्रामसभेत एकूण २०० च्या वर ग्रामसभेचे सदस्य गर्भवती माता व पालक प्रामुख्याने उपस्थित होते. या ग्रामसभेच्या निमित्त ग्रा.प. अंतर्गत एक वेगळा उपक्रम राबविण्यात आले. यात ग्रा.प. मध्ये लावण्यात आलेल्या प्रोजेक्टर स्क्रिन बोर्डावर दर मंगळवारी व ग्रामसभेच्या दिवशी आदिवासी गरिब महिलांसाठी मोफत आरोग्य विषयक सल्ला देण्याचा उपक्रम सुरू करून आपले ग्रा.प. चे स्थान तालूक्यात उच्च केला आहे. या सोबतच ग्रा.प. अंतर्गत असणा-या सर्व अपंग व्यक्तींना तीन टक्के अपंग करीता खर्चामधून तीन चाकी सायकल व ब्लँकेटचे वाटप ग्राम सभेत उपस्थित प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या साहित्य वाटपासमुळे सर्व अपंग व्यक्तींच्या चेह-यावर अभिमान व आनंद झळकत होते. या ग्रामसभेचे प्रास्ताविक व संचालन सचिव एस.डब्ल्यू. बन्सोड यांनी तर उपस्थितांचे आभार पोलीस पाटील राजेंद्र गावळकर यांनी मानले.