गोंदियात कर्करोग जनजागृती करिता 2 दिवसीय सौंदर्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

0
10

गोंदिया,berartimes.com दि.01- विदर्भाच्या शेवटच्या टोकावरील गोंदिया शहरात आराध्या ब्युटी असोसिएशन,सौम्या ग्रुप, ब्युटी अॅंड सेलाॅन आणि आकार प्रदर्शनी यांच्या संयुक्त विद्यमाने 7 आणि 8 मार्च 2017 ला स्वागत लाॅन येथे 2 दिवसीय सौंदर्य सेमिनार चे आयोजन करण्यात आले आहे. गोंदिया येथील आराध्या आणि सौम्या ग्रुप हे सौंदर्या सोबतच सामाजिक कार्य ही करतात. आज सर्वत्र कर्करोग हे गंभीर आजार उफाळून आला आहे. सदर सौंदर्य प्रशिक्षण कार्यशाळा ही कर्करोग जनजागृती करिता आयोजित असून या पुढे ही अमली पदार्थ विक्री, दिव्यांग मुले-मुली,निराधार वयोवृद्धांसोबतच सौदर्य च्या शिक्षेकरिता काम करणार असल्याचे आराध्या ब्युटी ग्रुप ची स्निगधा पुरोहित यांनी आयोजित पत्रपरिषद सांगितले. पुढे अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले की या कार्यशाळेत विविध प्रतियोगिताच्या माध्यमातून मुंबईतील नावाजलेले कलाकारांद्वारे आपली प्रतिभा प्रदर्शित केली जाणार आहे. यात अहमदाबाद येथील सौंदर्यकलाकार उर्वशी दवे, केस कलाकार मास्टर पंकज आणि मुंबई ची नखे कलाकार पायल सिंध सोबतच अर्चना ठक्कर आणि रिचा दवे ,अशोक पालिवाल-उदयपुर, संजय शर्मा सलून मॅनेंजमेंअ आदि कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेत उदयोन्मुख कलाकार आपली कला ची सर्वांना ओळख करून देणार आहेत. या कलाकारांत प्रार्थना मेश्राम, सर्वजीत कौर, मंजुला राउत, भाव्या वाधवा, अली अहमद, राज सुनारीवाल, अर्चना देशमुख,संगिता लोहार, पूजा आनंद, मेघा जैन, अगमप्रीत सिंद्धू ,उदित सत्यापत सहभागी होणार आहेत. दोन दिवसीय या प्रशिक्षण कार्यशाळेतील विविध स्पर्धेत इंडियन ब्राईड मेकअप, वेस्टर्न ब्राईड मेकअॅप, फेंटासी मेकअॅप, नेल आॅर्ट, हेअर स्टाईल, हेअर कट आदि स्पर्धा होणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होण्या करिता नोंदणी 14 फरवरी पूर्वी करणे आवश्यक असल्याचे आयोजन समिती प्रमुख स्निगधा गोपाल पुरोहित ,प्रार्थना मेश्राम, संजय शर्मा, शाहनवाज शेख यांनी सांगितले.