लाखनी येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण

0
22

लाखनी,दि.16- येथील क्रीडा संकुल सभागृहात तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत वाघाये उपस्थित होते. तसेच स्वप्नपुर्ति फाउंडेशनचे सदस्य आशीष राऊत, निट्स कंप्यूसिसचे मुख्य संचालक नितेश टिचकुले हे देखील उपस्थित होते. सागर साखरे आणि विवेक टिचकुले यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत ५० स्पर्धकांनी  सहभाग घेतला होता. विविध वयोगटात ही स्पर्धा ही घेण्यात आली. यामध्ये ११ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक समीर काशिवार तर द्वितीय क्रमांक प्रज्वल ढोमने व पुष्कर खंडाईत यांनी पटकावला. १७ वर्ष वयोगटात मूलांमधून विशाल मेश्राम याने प्रथम क्रमांक तर अभिषेक पाखमोडे याने द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्ष वयोगटात मूलींमधून सलोनी वैद्य हिने प्रथम क्रमांक तर ऋचा भिवगडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. १९ वर्ष वयोगटात मूलांमधून अविनाश पाखमोडे प्रथम तर आकाश भिवगडे द्वितीय तर मुलींपैकी कृतिका मोहनकर प्रथम आणि स्वाती वैद्य द्वितीय तसेच २१ वर्ष वयोगटात कुणाल येळणे प्रथम तर अखिल गिरेपुंजे याने द्वितीय क्रमांक पटकावला. उपस्थित सर्व अतीथींनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विवेक टिचकुले यांनी केले.