भंडारा जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी प्रिमिअर लीग क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन

0
9

भंडारा,दि.१ जून- देशभरात क्रिकेट खेळाची लोकप्रियता वाढली आहे. अनेकांनी क्रिकेट मध्ये मोठे करियर केले. अद्यापही ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये क्षमता असूनसुद्धा त्याला योग्य प्रकारचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळत नसल्याने माघारलेले आहेत. परंतु स्पोर्ट्स एडिक्शन ग्रुप तर्फे भंडारा जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील मुले व मुली क्रिकेट खेळाडूंकरिता एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. खेळाडूंनी सदर संधीचा लाभ घ्यावा व जनतेनी आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंपैकी सचिन तेंडुलकर घडवायला सहकार्य करण्याचे आवाहन स्पोर्ट्स एडिक्शन ग्रुपचे भंडारा जिल्हा सेक्रेटरी महेंद्र निंबार्ते यांनी केले.

दिनांक ११ जून २०१७ ला सर्वप्रथम जिल्ह्यातील १७ तसेच १९ वर्षाखालील मुले व मुली क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी भंडारा येथे चैतन्य पोलीस ग्राउंड वर होणार आहे. त्यानंतर निवडल्या जाणाऱ्या खेळाडूंच्या लीग मॅचेस होतील. जिल्हा, विभागीय, राज्य पातळीवर सामने झाल्यानंतर क्षमतावान खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी सुद्धा प्राप्त होऊ शकते.उत्कृष्ट खेळाडूला असोशिएशन तर्फे एक वर्षाची स्पॉन्सरशिप दिली जाईल. अशी माहिती विदर्भचे सेक्रेटरी रोहितकुमार मिश्रा यांनी दिली.

भाग घेण्याकरिता इच्छुक खेळाडूंनी दिनांक ९ जून २०१७ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. आपल्या तालुक्यातील खाली दिलेल्या ठिकाणी नोंदणी करावी. भंडारा येथे निखिल साखरकर ७४१४९०९२७०, पवनी शशिकांत भोगे, प्रगती पतसंस्था ९८९०३७५५२१, धर्मेंद्र नंदरधने ९८९०१७५२१८, अड्याळ नितीन अंबादे ९७६४०२६७७५, कोंढा-कोसरा मंगेश उके ९९२३९२७९२७, लाखनी पराग अतकरी लक्ष्मी झेरॉक्स ७०३८२५५८०५, गायधनी किराणा स्टोर्स ८२७५२९८८८६, साकोली राकेश भास्कर, यश पॅथलॉजी ९४२२१५२८३३, लाखांदूर विजय मेश्राम गीताचार्य तुकारामदादा महाविद्यालय ७५८८७७०८९६, तुमसर राकेश धार्मिक ८३०८३५२३०१, दिलीप सार्वे प्लायवुड ९४२२८३३६८३, मोहाडी शोमल गजभिये इमामवाडा चौक राजेंद्र वॉर्ड ९७६५६९६९८१, वरठी प्राचार्य आशिष बोरकर स्व पर्बताबाई मदनकर महाविद्यालय ९४२३६७१८९५ नोंदणी झाल्यानंतर अधिक माहितीकरिता वेदांत निंबार्ते ७५८८००६६६६ यांच्याशी संपर्क करावे असे आयोजन समितीने कळविले.