क्रीडास्पर्धांमुळे सर्वांगीण विकास – भाग्यश्री बिले

0
29

साकोली,दि.13- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय भंडारा तसेच तालुका क्रीडा संकुल समितीच्या संयुक्त विद्यमाने व शिक्षण विभागाच्या सहकार्याने सत्र २0१७-१८ या शैक्षणिक सत्रातील शासकीय शालेय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन सभा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आली.
यावेळी भाग्यश्री बिले यांनी सांगितले की, जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थ्यांना या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित करा. कारण क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. तसेच देशात ऑक्टोबर महिन्यात १७ वर्षाखालील फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होणार आहे. त्यासाठी सगळीकडे फुटबॉलमय वातावरण निर्मिती करण्याचेही आवाहन त्यांनी केले. यावेळी टेंभुर्णे, इटणकर, मरस्कोहे, कुरैशी यांनीही स्पर्धेसंबंधी मार्गदर्शन केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी एन. ए. टेंभुर्णे, वरिष्ठ क्रीडा अधिकारी दिलीप इटनकर, तालुका क्रीडा अधिकारी अनिराम मरस्कोल्हे, क्रीडा संघटक शाहिद कुरैशी, राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराम चौधरी, मंगेश गुडधे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन दोनोडे यांनी तर आभार अरविंद पुस्तोडे यांनी मानले. सभेच्या यशस्वितेसाठी ईश्‍वर वरकडे, अनिल लांडेकर, कुसराम यांनी सहकार्य केले.