महिला बचत गटामार्फत आजपासून सेतू केंद्राचा प्रांरभ

0
20

चंद्रपूर ,दि.13-: जिल्हयातील महिला बचत गटामार्फत सेतू केंद्र चालविण्याचा पहिला प्रयोग होत आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी महिला आर्थिक विकास महामंडळातंर्गत (माविम) येणा-या लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) यांना १५ तालुक्यात सेतू केंद्र चालविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांनी माविमच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपात याची घोषणा केली.
सेतू केंद्र चालविण्यासाठी आवश्यक असणा-या प्रशिक्षणाला जिल्हयातील पंधराही तालुक्यातील सीएमआरसीच्या प्रमुख तथा सेतू केंद्र चालविण्यासाठी आवश्यक असणा-या संगणक चालकांचे अंतिम प्रशिक्षण संपन्न झाले. राज्य शासनाच्या आपले सरकार या लोकप्रिय वेबपोर्टलवरुन ३१ विभागाच्या ३९२ सेवा नागरिकांना उपलब्ध केल्या जातात. जिल्हयातील सर्व सेतू केंद्रातून या सुविधा पुरविल्या जातात. प्रत्येक तहसिलमध्ये उपलब्ध असणारे हे सेतू केंद्र आता महिलामार्फत चालविण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये सेतू केंद्र महिला बचत गटांमार्फत सुरु ठेवण्याचा हा पहिलाच प्रयोग असून या सर्व केंद्रांच्या प्रमुख महिलाच असणार आहेत. याशिवाय केंद्र चालविण्यासाठी पुरक तांत्रिक सेवा सुध्दा सुशिक्षीत महिला व युवती पुरविणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या तहसिलदारांनी या नव्या यंत्रणेत स्वत: लक्ष घालून या महिलांना मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.