खेळाडूंना शहरात सर्व सुविधा मिळणार : नगराध्यक्ष इंगळे

0
21
गोंदिया ,दि.२५-: गोंदिया शहरातील खेळाडू आंतरराष्टÑीय स्तरावर पोहचावेत अशी माझ्यासह सर्वांची इच्छा आहे. याकरीता शहरातील विविध क्षेत्रातील खेळाडूंसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी नगर परिषद कार्य करीत असून भविष्यात खेळाडूंना सुसज्ज मैदाने व सोयीसुविधा उपलब्ध होतील, असे आश्वासन नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी देवून संस्थेच्या कार्याबद्दल अभिनंदन केले.
ते गणेशनगर येथील जे. एम. शाळेच्या पटांगणावर एससीसी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने आयोजित रात्रकालीन ‘नाईन-ए-साईड’ क्रिकेट टुर्नामेंटच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर नगरसेवक भरत क्षत्रीय, युवा उद्योजक रोशन जायस्वाल, जयंत शुक्ला, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे,  आदित्य अग्रवाल, प्रदिपसिंग ठाकूर, चंद्रभान तरोणे, बदर शेख, रमाशंकर शर्मा, नरेश जायस्वाल, राम चाचेरे, आशिष शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जयंत शुक्ला यांनी संस्थेच्या विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती देत हे क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाचे सहावे वर्ष असल्याचे सांगितले. तरूणांनी संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविल्याची माहिती दिली. दरम्यान, नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी मैदानावर पुजा करून व फित कापून स्पर्धेचा शुभारंभ केला. उद्घाटन सामन्याच्या राईस सिटी व बीएमसी संघातील खेळाडूंशी परिचय करून घेत नाणेफेक केला. नऊ दिवस चालणाºया या स्पर्धेचा समारोप २९ आॅक्टोबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत शहरासह परिसरातील एकूण ३२ संघ सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाचे संचालन राजू गील यांनी केले. तर आभार नरेश जायस्वाल यांनी मानले. स्पर्धेच्या आयोजनासाठी एमसीसी बहुउद्देशीय संस्थेचे विक्की शर्मा, अभिषेक श्रीवास्तव, पलाश अग्रवाल, मोहम्मद शाहरूख, निक्की शर्मा, बाबा बागडे, प्रशांत कोरे, धीरज अग्निहोत्री, आलोक घोष, बाळा ठाकरे, नितेश पांडे, निशांत श्रीवास्तव, अमर शर्मा, अक्कू कुरील, राम नागपुरे, टिंकू मक्कड, संदिप पृथ्यानी, अब्दूल्ला, सन्नी खान, शिवा मरकाम, विक्रम वाजपेयी,  पराग लिचडे, काकू गील, ललीत गुप्ता, श्रीभूवन मिश्रा, गुल्ला अग्रवाल, दर्शन मक्कड, वेदांत अग्रवाल, कैलाश सांखला, गुंजन ठाकरे आदी परिश्रम घेत आहेत.