राष्ट्रसंताचे साहित्य उच्च कोटीचे ; डाँ .हरिश्चंद्र बोरकर

0
17

गडचिरोली,दि.24: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी माणुस समोर ठेऊन मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मान केले. माणसाला माणुसकीची जाणीव होण्यासाठी आणि सुयोग्य परिवर्तन घडविण्यासाठी सामुदायीक प्रार्थना ही खरी गुरुकिल्ली आहे.समाज निर्मानाचे मोठे कार्य करणा-या राष्रसंताची ग्रामगीता ही ग्रामीनांची ज्ञानेश्वरी असुन त्यांचे संपुर्ण साहित्य देशातील घराघरात पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे प्र-कुलगुरु डाँ.चंद्रशेखर भुसारी यांनी केले.
गडचिरोली येथील कर्मयोगी तुकारामदादा साहित्य नगरी, सामुदायिक प्रार्थना मंदिर येथे राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेद्वारे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन आयोजीत करण्यात आले. या संमेलनात उदघाटक म्हणुन डाँ.भुसारी बोलत होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डाँ.हरीश्चंद्र बोरकर, स्वागताध्यक्ष डाँ.शिवनाथ कुंभारे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,आचार्य रामकृष्ण अत्रे,तेलंगणा प्रदेशचे प्रचारक क्रिष्टा रेड्डी जिट्टावार, डाँ नवलाजी मुळे, अंजनाबाई खुणे इ.मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना डाँ.भुसारी यांनी राष्ट्रसंताचे विचार जिवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रभावी असुन गोंडवाना विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली. यावेळी बोलतांना संमेलनाध्यक्ष डाँ.हरीश्चंद्र बोरकर यांनी राष्ट्रसंताची ग्रामगीता व संपुर्ण साहित्य हे अलंकार,छंद,रस,ताल यांचा सर्वांगसुंदर वापर करीत लिहीले असल्याचे सांगुन साहित्याच्या आधुनिक कसोटीवर हे साहित्य उच्च प्रतीचे असल्याचे ते म्हणाले.