योगा स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह शाळेचे सुयश

0
9

गोंदिया,,दि.30: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्याच्या पुणेच्या वतीने आयोजित योगा स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विभागीय स्तरासाठी स्थान सुनिश्‍चित केले आहे. ज्यामध्ये दिक्षित हिडको, प्रवीण टेकाम यांची निवड झालेली असून पुढील आयोजित होणार्‍या विभागीयस्तरीय योगा स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याची नेतृत्व करतील.
यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडील व शिक्षण संस्थाध्यक्ष पंकज कटकवार, सचिव डॉ.एन.आर. कटकवार यांना दिले. या विद्यार्थ्यांचे प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, वाय.आशा राव, अभय गुरव, वीणा कावळे, कृष्णा चव्हाण, निधी व्यास, मीनाक्षी महापात्रा, विकास पटले, राहुल रामटेके, दिव्यांशु जायस्वाल, प्रमोद वाडी, शिल्पा सिंग, कल्याणी रहांगडाले, वर्षा सतदेवे, तोमेश पारधी, सुरेखा बघेल, रुपकला रहांगडाले, क्रीडा अध्यापिका ज्योती पहिरे, हेमा नायडु, पंकज खैरे, डॉ. लालचंद पारधी, किरण कांबळी, शेंडे, मेंढे, खुशबू बांगडकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विभागीय स्पध्रेसाठी शुभेच्छा दिल्या.