राज्य तायक्वांदो स्पध्रेसाठी प्रोग्रेसिव्हची निवड

0
5

गोंदिया,दि.21ः- क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेच्या वतीने गोंदिया येथे आयोजित विभागीय तायक्वांडो स्पर्धेत श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदियाद्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह इंग्रजी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन करीत राज्यस्तरावर होणार्‍या तायक्वांडो स्पर्धेत आपले स्थान सुनिश्‍चित केले आहे.
राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत सेजल तुरकर, चक्रधर कोडांडा यांची निवड झालेली असून या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे नेतृत्व त्यांच्याद्वारे करण्यात येईल. यशस्वी विद्याथ्यारनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडील व संस्थाध्यक्ष डॉ.पंकज कटकवार, सचिव डॉ.एन.आर.कटकवार, प्राचार्य ओ.टी.रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, वाय.आशा राव, कुलदीप भौतिक, अभय गुरव, वीणा कावळे, कृष्णा चव्हाण, निधी व्यास, मीनाक्षी महापात्रा, विकास पटले, राहुल रामटेके, दिव्यांशू जैस्वाल, प्रमोद वाडी, शिल्पा सिंग, कल्याणी रहांगडाले, वर्षा सतदेवे, तोमेश पारधी, सुरेख बघेल, रुपकला रहांगडाले, क्रीडा अध्यापिका ज्योती पहिरे, हेमा नायडू, पंकज खैरे, डॉ.लालचंद पारधी, किरण कांबडी, खुशबू बांगडकर यांना दिले. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पध्रेसाठी शुभेच्छा दिल्या.